भारत इंग्लंड यांच्यातील वीस षटकांच्या सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड विरुद्ध आगामी वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून काल भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. ईशान किशन, सुर्यकुमार यादव, राहुल तवेटीया यांचा नव्याने संघात समावेश करण्यात आला आहे. तर यष्टीरक्षक रिषभ पंत, अष्टपैलू अक्षर पटेल, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हे संघात परतले आहेत.

१९ जणांचा भारतीय संघ असा असेल – कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, के. एल राहुल शिखर धवन, श्रेयस ऐय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, ईशान किशन, यझुवेन्द्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तवेटीया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर. ५ सामन्यांची हि मालिका अहमदाबाद इथं १२ मार्च पासून सुरु होईल.

Popular posts
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Image