ट्विटरला सरकारी आदेशांचे पालन करणे अनिवार्य - केंद्र सरकार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह हॅशटॅग चालवणारी खाती आणि ट्वीटरस बंद करण्याचे आदेश देऊनही अशी खाती अनब्लॉक केल्याबद्दल केंद्र सरकारने ट्विटरला कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह संदेश आणि असे संदेश देणाऱ्या खात्यांवर बंदी आणणायचे आदेश ट्विटरला दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी ट्विटरने केली नसल्याचे आढळल्याने सरकारने ट्विटरला नोटीस बजावली आहे.

ट्विटरला सरकारी आदेशांचे पालन करणे अनिवार्य असून, ट्विटर न्यायालयाची भूमिका बजावू शकत नाही, असेही सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे.