केंद्रीय अर्थसंकल्प हा संपूर्ण देश डोळ्यासमोर ठेवून तयार करायला हवा, केवळ निवडणुकांसाठी असता कामा नये, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका

 

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्प हा संपूर्ण देश डोळ्यासमोर ठेवून तयार करायला हवा, केवळ निवडणुकांसाठी असता कामा नये, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली आहे.

अर्थसंकल्पाकडे सगळ्या देशाचं लक्ष असतं आणि सर्व थरांमधल्या नागरिकांना त्यातून अपेक्षा असतात, केवळ काही राज्यांमधल्या आगामी निवडणुका डोळ्यामोर ठेऊन तयार केलेला अर्थसंकल्प लोकांच्या अपेक्षांची पूर्तता कशी करणार, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.