राज्यात काल ५ हजार ३५ रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५ हजार ३५ रुग्ण या कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ९९ हजार ९८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ पूर्णांक ९६ टक्के इतकं झालं आहे.

काल ५ हजार २१० नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या २१ लाख ६ हजार ९४ झाली आहे. सध्या राज्यभरात ५३ हजार ११३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८०६ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ४६ शतांश टक्के झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात काल २२६ आतापर्यंत १६ हजार १५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल २२४ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे, रुग्ण संख्या २o हजार १८२ झाली आहे. सध्या २ हजार ९o रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ९o रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जालना जिल्ह्यात काल पाच रुग्ण बरे होऊन घरी गेले जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ७३२ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत काल १३७ नवीन रुग्ण आढळल्यामुळे रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ६६५ झाली आहे सध्या ५४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

परभणी जिल्ह्यात काल बरे झालेल्या २२ रुग्णांना घरी पाठवलं. जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ७८३ रुग्णांनी या आजारावर मात केले आहे. काल २२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आल्यामुळे, रुग्ण संख्या वाढून ८ हजार २९o झाली आहे. सध्या १८६ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ३२१ रुग्ण दगावले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात काल १३, तर आतापर्यंत ९ हजार ३३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. काल १५ रुग्णांना या आजाराची लागण झाल्यामुळे, रुग्णांचा आकडा ९ हजार ८७o वर पोचला आहे. सध्या १३२ रूग्ण उपचार घेत आहेत.

नांदेड जिल्ह्यात काल २५ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार २९ रुग्ण बरे होऊन घरी गेले काल ५९ नवीन रुग्ण आढळल्यामुळे, बाधितांची  संख्या २३ हजार २o८ झाली आहे. सध्या ३७५ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात या आजारानं ५९३ रुग्णांचा बळी घेतला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात काल ९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ६८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. काल ३५o रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आल्यामुळे, रुग्ण संख्या १६ हजार ४९६ वर पोचली आहे. सध्या १ हजार ६२३ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे १८७ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.

नागपूर जिल्ह्यात काल ४३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३३ हजार २९८ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. काल नव्यानं ७१o रुग्णांची नोंद झाल्यामुळे, रुग्ण संख्या वाढून १ लाख ४३ हजार ८४३ झाली आहे. जिल्ह्यात या आजारामुळे ४ हजार २८३ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.