स्थानिक खेळण्यांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांचं प्रधानमंत्रींनी केलं कौतुक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय परंपरा, कौशल्य यांचा मान ठेवून स्थानिक खेळण्यांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे.

कर्नाटकमधल्या चन्नपट्टणा स्थानकावर आत्मनिर्भर भारताला अनुसरून स्थानिक हस्तकला आणि खेळण्यांचं प्रदर्शन मांडलं असल्याचं ट्वीट रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे.

ह्या ट्वीटचा संदर्भ मोदी यांनी दिला आहे.