सकारात्मक विचारसरणीने आणि सामुहिक प्रयत्नाने कोरोनावर विजय मिळवू : आ. सुनिल शेळके

 


शाम लांडे यांचे सामाजिक उपक्रम प्रशंसनीय : आ. सुनिल शेळके

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराचे नाव जागतिक नकाशावर सुनियोजित शहर म्हणून उदयाला आले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व या शहराला लाभल्यामुळेच पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक आहे. शरद पवार यांच्या माध्यमातून अजित पवारांनी हजारो कोटींचा निधी शहरातील विकास कामांना उपलब्ध करुन दिला. त्यामुळेच मोठे प्रकल्प शहरात उभे राहिले. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. त्याच प्रमाणे सकारात्मक विचारसरणीने आणि सामुहिक प्रयत्नाने आपण सर्व कोरोनावर विजय मिळवू. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कासारवाडीचे नगरसेवक शाम लांडे यांचे विविध सामाजिक उपक्रम प्रशंसनीय आणि इतर लोक प्रतिनिधींना प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन आमदार सुनिल शेळके यांनी केले.

    सिताबाई गणपतराव लांडे प्रतिष्ठान आणि नगरसेवक शाम लांडे मित्र परिवारांच्या वतीने शुक्रवारी (दि. 12 फेब्रुवारी) कासारवाडीतील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, संयोजक नगरसेवक शाम लांडे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी पक्षनेते जगदिश शेट्टी, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक विक्रांत लांडे, माजी नगरसेवक वसंत बोराटे, विनायक रणसुभे, राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षा वर्षा जगताप, राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा शिल्पा बिडकर, उषा पवार आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार शेळके म्हणाले की, गेले आठ, नऊ महिण्यांपासून नगरसेवक शाम लांडे यांनी सामाजिक बांधिलकेच्या जाणिवेतून प्रभागातील हजारो गरीब कुटूंबांना किराणा मालाचे किट, औषधांचे किट वाटप केले. तसेच गणपती विसर्जनासाठी भाविकांची सोय व्हावी म्हणून दारोदारी फिरते पाण्याचे हौद उपलब्ध करुन दिले. शहराच्या शैक्षणिक क्षेत्राला भुषणावह ठरेल अशी अत्याधुनिक शाळा त्यांच्या प्रयत्नातून कासारवाडीत साकारली आहे. मागील दहा महिण्यांपासून संपुर्ण जग कोरोना या जागतिक महामारीच्या सावटाखाली आहे. पुण्यात तयार झालेल्या लसीमुळे आपण लवकरच त्यावर विजय मिळवू. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यामुळे आता शाळा देखिल सुरु होत आहेत. शाळेत येणा-या विद्यार्थ्यांना सुरक्षेसाठी मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्याचा नगरसेवक शाम लांडे यांचा उपक्रम अनुकरणीय आहे असे प्रतिपादन आमदार सुनिल शेळके यांनी केले.

कासारवाडीतील मनपाच्या छत्रपती शाहू महाराज प्राथमिक, माध्यमिक मराठी व इंग्रजी माध्यम शाळा, विद्या विकास प्रशाला, आचार्य आनंद ऋषिजी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या संयोजनात सयाजी लांडे, घनश्याम खळदकर, संजय लांडे, प्रविण वाबळे, कैलास लांडे, राजेंद्र शेळके, रमेश लांडगे, संजय कुंदर, गणेश मातेरे, रतन लांडगे आदींनी सहभाग घेतला. स्वागत शाम लांडे, सुत्रसंचालन विनायक रणसुभे आणि आभार सयाजी लांडे यांनी मानले.