आज जागतिक रेडिओ दिन साजरा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक रेडिओ दिनानिमित्त केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरांनी आज शुभेच्छा दिल्या आहेत. रेडिओच्या माध्यमातून ग्रामीण भागाशी संवाद साधणं सोपं झालं आहे, रेडिओचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे, असं जावडेकर यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.

जागतीक स्तरावरही आज रेडिओ दिवस साजरा केला जातो. २०११ पासून युनोस्कोशी संलग्न राष्ट्र हा दिवस साजरा करतात. रेडिओ हे संवादाचं भक्कम माध्यम आहे, असं संयुक्तराष्ट्र संघाच्या सर्व साधारण सभेत या वर्षी जाहीर करण्यात आलं. नवं जग नवा रेडिओ, हा यावर्षीच्या रेडिओ दिनाचा विषय आहे.