नवं शहर वसवण्यापेक्षा मुंबईचा आखीव-रेखीव विकास आव्हानात्मक - उद्धव ठाकरे
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई वाढतेय, मात्र वाढत्या मुंबईचं कोणतंही नियोजन नाही. म्हणून आता मुंबईचा आखीव रेखीव विकास करतोय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत वांद्रे इथल्या कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच उद्घाटन आणि शिवडी - वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन, स्मार्ट वाहनतळ, आणि वांद्रे-कुर्ला संकुलात सायकल ट्रॅक आदी प्रकल्पांचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
नवं शहर वसवण्यापेक्षा हा विकास आव्हानात्मक असल्याचं ते म्हणाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे, महापौर किशोरी पेडणेकर, एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए.राजीव आदी उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.