एमजी झेडएस' इलेक्ट्रिकल कारचे अपडेटेड व्हर्जन ८ फेब्रुवारीला लाँच होणार
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : एमजी मोटर्स 'एमजी झेडएस' या गतवर्षी लॉन्च करण्यात आलेल्या आपल्या पहिल्या इलेक्ट्रिकल कारचे अपडेटेड व्हर्जन ८ फेब्रुवारी २०२१ रोजी लाँच करणार आहे.
४ मिलियन उत्सर्जन-मुक्त किलोमीटर्स, ९३५ टन इतके कमी CO२ उत्सर्जन, जे ५६०७ पूर्ण वाढलेल्या वृक्षांइतके होते, १० ईव्ही इकोसिस्टम पार्टनर्स नेमले, देशभरातील चार्जिंग नेटवर्क मजबूत केले. हे सर्व कंपनीने अवघ्या एका वर्षात केल्याची माहिती दिली आहे. कंपनी आता नवीन चाप्टर सुरू करणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. भारतीय बाजारपेठेत एमजीची इलेक्ट्रीक कार ही इतरांपेक्षा वेगळी व हटके असणार आहे. एमजी मोटरने याआधी आपली इलेक्ट्रीक एसयूव्ही झेडएस लाँच केलेली. या कारची किंमत किती असणार आहे, याची माहिती ८ फेब्रुवारी रोजी उघड होणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.