देशात आतापर्यंत एक कोटी सहा लाख ६२५ रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १२ हजार १४३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या १ कोटी ८ लाख ९२ हजार ७४६ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५५ हजार ५५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ११ हजार ३९५ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत १ कोटी ६ लाख ६२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या एक लाख ३६ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशभरात आतापर्यंत ७९ लाख ६७ हजार ६४७ नागरीकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image