बांबू हा ऑक्सिजनचा फार मोठा स्रोत - पाशा पटेल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त झाडं लावणं गरजेचं आहे, त्यात बांबू हा ऑक्सिजनचा फार मोठा स्रोत असल्यानं सर्वांनी बांबू लावण्यात पुढाकार घ्यावा, असं आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष आणि इंडिया बांबु फोरमचे संस्थापक सदस्य पाशा पटेल यांनी केलं आहे.

ते काल परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.शेतकर्यां नी बांबूची लागवड करुन चांगलं उत्पन्न घ्यावं, असं त्यांनी सांगितलं.