कोविड-19 च्या लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवा - केंद्र सरकारची राज्यांना सूचना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 च्या लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवावा असं केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल राज्यांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांसमवेत लसीकरणाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली, त्या बैठकीत  ही सूचना करण्यात आली.

प्रत्येक लसीकरण सत्रात सध्याच्या सरासरी संख्येपेक्षा अधिक व्यक्तींना लस देण्यास पुष्कळ वाव असल्याचं राजेश भूषण  यांनी यावेळी सांगितलं.  लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या दरदिवसाच्या सरासरी संख्येचं विश्र्लेषण करून त्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीनं आवश्यक पावलं उचलावीत अशी सूचनाही या बैठकीत राज्याच्या आरोग्य सचिवांना करण्यात आली.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image