मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सलग नवव्या सत्रात वाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बाजारपेठेतले सकारात्मक कल आणि कोविड १९ वरच्या प्रतिबंधात्मक लसीच्या आपत्कालीन वापरला मिळालेली मंजुरी यामुळे शेअर बाजारात आज तेजीचं वातावरण होतं.

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज सलग नवव्या सत्रात वाढ नोंदवली.

निर्देशांक तीनशे आठ अंकांच्या वाढीसह अट्ठेचाळीस हजार एकशे शहात्तर अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी देखील एकशे चौदा अंकांची वाढ नोंदवत चौदा हजार एकशे सत्तेचाळीस अंकांवर बंद झाला.