देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३९ शतांश टक्के

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३९ शतांश टक्के झालं आहे. काल २० हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ कोटी ३७ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

कोरोनामुक्तीचा देशातला दर हा जगातल्या उच्चत्म दरापैकी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यापैकी सध्या उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या फक्त २ पूर्णांक १६ शतांश टक्के, म्हणजेच सुमारे सव्वा दोन लाख आहे. 

काल १८ हजार १३९ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्याची संख्या १ कोटी ४ लाखांच्यावर गेली आहे. देशभरात काल ३३४ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं कोरोना बळीची एकूण संख्या १ लाख ५० हजार ५७० झाली आहे. देशाचा कोविड मृत्यू दर १ पूर्णांक ४५ शतांश टक्के आहे.