शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातली चर्चेची दहावी फेरी पुढे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात आज होणारी चर्चेची दहावी फेरी पुढे ढकलण्यात आली असून ती आता उद्या होणार आहे. याबाबतचं निवेदन काल प्रसिध्द करतानाच कृषी मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं आश्वासन दिलं.

दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीची पहिली बैठक आज होणार आहे.