भारतीय हवाई दल आणि फ्रान्सचं हवाई दल यांच्यात संयुक्त सरावाला सुरुवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दल आणि फ्रान्सचं हवाई दल यांच्यात उद्या जोधपूर इथं संयुक्त सरावाला सुरुवात होणार आहे. फ्रान्सच्या पथकात राफेलसह अन्य काही विमानं आणि १७५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भारतीय हवाई दलाच्या पथकात मिराज २०००, राफेल आणि अन्य विमानांचा समावेश आहे. दोन्ही पथकांमधला राफेलचा समावेश हे या सरावाचं उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे.