स्मारक समितीतर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन

 स्मारक समितीतर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयाजवळील उद्यानातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आज महात्मा गांधी स्मारक समितीतर्फे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी स्मारक समितीचे सरचिटणीस देवराज सिंह, सचिव सुमन पोवार, प्रा. अमर सिंह तसेच विजय आडिवरेकर, रवी बंगेरा, सगुण घरणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कोविड-19 च्या पार्श्वभूमिवर भजन, शाळेतील मुलांची उपस्थिती आदी कार्यक्रम टाळून मोजक्या उपस्थित हा अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.