राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं आजपर्यंत एक लाखांहून अधिक प्राण वाचवले - नित्यानंद रॉय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारला आपत्ती निवारण दलावर पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 16 व्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दिनाच्या स्थापना निमित्तानं ते नवी दिल्ली इथं बोलत होते.  राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं राज्य आपत्ती निवारण दलासोबत समन्वय साधून काम करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. 2006 या वर्षी स्थापन जालेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं आजपर्यंत एक लाखांहून अधिक प्राण वाचवले असून, साडेसहा लाखाहून अधिक लोकांना संकटांमधून वाचवल्याचंही रॉय यांनी यावेळी सांगितलं.