९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक इथं होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अन्न आणि नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची निवड झाली आहे.

संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त माजी आमदार हेमंत टाकले यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. स्वागत समितीच्या उपाध्यक्षपदी विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषी मंत्री दादा भुसे, शिक्षण तज्ञ डॉ मो. स. गोसावी तसंच प्राचार्य प्रशांत पाटील यांची निवड केली आहे.