मुंबईतील उपनगरी रेल्वे सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवा येत्या सोमवारी, म्हणजे १ फेब्रुवारीपासून,गर्दी होणार नाही अशावेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठीही सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार आता सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासूनसकाळी ७ वाजेपर्यंत, तसंच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासूनशेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. सर्वसामान्य प्रवाशांनासकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांतप्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्टप्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

दरम्यान सर्व सामान्यांसाठी उपनगरी रेल्वे प्रवास सुरु करण्यासंदर्भात राज्य शासनाचाप्रस्ताव मिळाल्याचं मध्य रेल्वे प्रशासनानंही स्पष्ट केला आहे. या प्रस्तावाला संबंधित यंत्रणेकडून परवानगी मिळाल्यानंतर, पुढची कार्यवाही केली जाईल, असंही मध्य रेल्वेनं म्हटलं आहे.सर्वांची सोय व्हावीयादृष्टीनं मुंबई आणि उपनगरातल्या विविध कार्यालयं आणि आस्थापनांनी कामाच्यावेळांमध्ये सुधारणा करावी, असंही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन,मदत आणि पुनर्वसनविभागानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.  मुंबई आणि मुंबई महानगरक्षेत्रातली दुकानं आणि आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत,तर उपाहारगृहं रात्री १वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील, दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अटतसंच उपाहारगृहं, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणेअंमलबजावणी राहील, असंही स्पष्ट केलं आहे.

दरम्यान मुंबईत आजपासून प्रवाशांसाठी लोकलच्या सुमारे २०४ अतिरीक्त फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यापैकी ९९ फेऱ्या पश्चिम रेल्वेवर सुरू झाल्या तर उर्वरित मध्य रेल्वेवर आहेत. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय मात्र अजून झालेला नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी आणि ठराविक वेळेत महिलांना लोकल प्रवासाची मुभा आहे.

दरम्यान सर्व सामान्यांसाठी उपनगरी रेल्वे प्रवास सुरु करण्यासंदर्भात राज्य शासनाचा प्रस्ताव मिळाल्याचं मध्य रेल्वे प्रशासनानंही स्पष्ट केला आहे. या प्रस्ताला संबंधित यंत्रणेकडून परवानगी मिळाल्यानंतर, पुढची कार्यवाही केली जाईल असंही मध्य रेल्वेनं म्हटलं आहे.