आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्रसरकार यांच्या दरम्यान चर्चेची ११ वी फेरीची चर्चा,मात्र तोडगा नाही

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं केंद्र सरकार आणि दिल्ली इथं शेतकऱ्यांच्या दरम्यान ११ व्या फेरीनंतर आज कुठलाही तोडगा निघाला नाही. 

कृषी कायदे दीड वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव काल केंद्र सरकरानं शेतकरी नेत्यांनी दिला होता. त्या दरम्यान या कायद्यांबाबत सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करु, असं आवाहन कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकरी नेत्यांना केलं होतं. मात्र संयुक्त किसान मोर्चाच्या आज झालेल्या बैठकीत हे कायदे रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.