प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम नवी दिल्लीत राजपथावर होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम आज नवी दिल्लीत राजपथावर होणार आहे. सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी  विजय चौकापासून या सरावाला सुरुवात होईल. त्यानंतर राजपथ, अमर जवान ज्योती, इंडिया गेट आणि नॅशनल स्टेडीयम या मार्गावरून हे सराव संचलन होईल. यासाठी दिल्ली पोलिसांनी वाहतूक यंत्रणेत आवश्यक बदल केला आहे.  या मार्गावरची वाहतूक काल संध्याकाळ पासूनच बंद करण्यात आली आहे.