राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची हजेरी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडला. नाशिक शहरातल्या सिडको, अंबड परिसराला आज अचानक बेमोसमी पावसानं झोडपून काढले. आज सकाळपासून संपूर्ण शहरात ढगाळ वातावरण आहे दुपारी दोनच्या सुमाराला जोरदार पावसानं हजेरी लावल.

त्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.सातारा शहर आणि परिसरासह तालुक्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. अवकाळी पावसानं गेल्या १२ तासात जिल्ह्याच्या विविध भागांना झोडपून काढलं आहे.

रायगड जिल्हय़ात आज सर्वत्र ढगाळ वातावरण असून दुपारी खोपोली,  खालापूर आणि कर्जत  या ठिकाणी सुमारे  अर्धा - पाऊण  तास जोराचा पाऊस झाला.ठाणे जिल्ह्यात टिटवाळा , मांडा  कल्याण ग्रामीण भागात गेल्या अर्धा तासापासून जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे , अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीपुणे शहरासह उपनगरातही आज पावसानं हजेरी लावली.