श्री.तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात

 

मुंबई (वृत्तसंस्था) : तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपून आज पहाटे देवीची पुन्हां सिंहासनावर प्रतिष्ठापना झाली.विधिवत घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज दुपारी सुरुवात झाली.

महोत्सवाचं मुख्य आकर्षण असलेली जलकुंभ यात्रा साध्या पद्धतीने साजरी केली जाणार असून सर्व धार्मिक कार्यक्रम कोरोना विषयक काळजी घेऊन होणार आहेत.यासाठी भाविकांनी सहकार्य करण्याचं  आवाहन तुळजापुरचे तहसीलदार आणि मंदिर समितीचे व्यवस्थापक सौदागर तांदळे यांनी केलं आहे.