मुलींच्या शिक्षणाची सोय आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रीय सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेअंतर्गत केंद्र सरकार मुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रीय सहभाग वाढवण्यासाठी वचनबद्ध असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. यादृष्टीनं मुलींच्या शिक्षणाचं उद्दिष्ट समोर समोर ठेवून समग्र शिक्षा कार्यक्रम ही एकात्मिक योजना सुरु केल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.

याशिवाय देशभरात शाळांमधलं मुलींचं प्रमाण वाढावं यासाठी शैक्षणिकदृष्ट्या मागस असलेल्या प्रदेशांसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांनाही मंजूरी दिली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. या शाळांच्या माध्यमातून सर्वच स्तरावर मागास प्रवर्गांमधल्या मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जात आहे.