योग्य ब्रोकरच्या निवडीसाठी फिनॉलॉजीचा 'सिलेक्ट' मंच

 


मुंबई: २०२१ मध्ये जास्तीत जास्त भारतीय गुंतवणूकदारांना ट्रेडिंग व गुंतवणुकीची चांगली सुरुवात करण्यासाठी फिनोलॉजी या भारताच्या सर्वात मोठ्या शिक्षण व वन स्टॉप इन्व्हेस्टमेंट व्यासपीठाने ‘सिलेक्ट’ या योग्य ब्रोकरची निवड करण्यासाठी उपयुक्त ठरणा-या मंचाची सुरुवात केली आहे. हा नवा मंच असंख्य भारतीय गुंतवणूकदारांसाठी अग्रेसर ब्रोकरेज कंपन्यांचा सखोल आणि नि:पक्षपाती आढावा सादर करतो. यासह हा मंच सिलेक्टसोबत अखंडपणे डिमॅट अकाउंट तयार करण्यास सक्षम करतो व १,००० रुपयांपर्यंतचे बक्षीसही उपलब्ध करतो.

फिनोलॉजीचे सीईओ प्रांजल कामरा म्हणाले, “सिलेक्टमध्ये सर्व अग्रगण्य स्टॉकब्रोकर्सचा तपशीलवार व नि:पक्षपातीपणे आढावा घेतलेला आहे. जेणेकरून कोणत्याही गुंतवणूकदाराला त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार त्याची पसंत निश्चित करता येईल. २०२१ मध्ये अधिक पारदर्शकतेने गुंतवणुकीची चांगली सुरुवात करण्यास ‘सिलेक्ट’ लोकांना सक्षम करेल.”

एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट आवश्यकतेनुसार सिलेक्ट मंच शॉर्टलिस्ट शीर्ष ब्रोकर्सची निवड करतो. ही निवड टॅप-अँड-अन्सर प्रश्नावली, नि:पक्षपाती रिव्ह्यू आणि रेटिंग तसेच वैयक्तिक उद्दिष्टांनुसार करता येईल. यानंतर हा मंच गुंतवणूकदारांना पुढील तंत्रज्ञान आधारीत कार्यपद्धती, समग्र रिव्ह्यू, सारांशित अंदाज आणि एकाच वेळी दोन किंवा अधिक ब्रोकर्सची तुलना करण्याची क्षमता प्राप्त करून देतो. याही पुढे जाऊन, सुरुवातीची ऑफर म्हणून १००० रुपयांचे फ्री गिफ्ट हँपर, स्टॉक मार्केट कोर्स, टिकर प्लस सबस्क्रिप्शन, अॅमेझॉन बेस्टसेलर ‘इन्व्हेस्टमनी’ आणि कोणत्याही ब्रोकरसोबत ट्रेडिंग अकाऊंट सुरु करण्यासाठी बरीच मदत करतो.

युट्यूबवर २ दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर्सच्या कम्युनिटीचे नेतृत्व करणारे इन्व्हेस्टमेंट गुरु प्रांजल कामरा यांचे ब्रेनचाइल्ड म्हणजे फिनोलॉजी. हा भारतातील आर्थिक शिक्षण देणारे आणि वन-स्टॉप इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन ठरणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. या व्यासपीठाचे ऑनलाइन कोर्स, रोबो अॅडव्हायजरी, लीगल सर्व्हिस व टिकर नावाचे स्टॉक रिसर्च इंटरफेस आहे. हे संबंधित स्टॉकचा तपशीलवार आढावा देणारे मोफत वापरायचे साधन आहे. हे समजण्यास सोपे आणि आपले ज्ञान वाढवणारे साधन आहे. या व्यासपीठाच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ‘सिलेक्ट’ ही नवी सुविधा समाविष्ट झाली आहे.