राष्ट्रीय युवा महोत्सवात बक्षीस विजेत्यांचे युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले अभिनंदन

  गांधीजींच्या विचारधारेचे अनुसरण करुया – पालकमंत्री सुनील केदार

मुंबई : भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय आयोजित युवा महोत्सव २०२०-२१ मध्ये महाराष्ट्र राज्याचे तीन युवकांनी विविध कलाप्रकारात राष्ट्रीय पातळीवर प्रथम आणि द्वितीय पारितोषिक पटवल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत शास्त्रीय संगीत सर्व वाद्य प्रकारातून बासरी वादनास औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील युवक वेंदांग उदय कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक मिळवला, शास्त्रीय संगीत हर्मोनियम मध्ये मुंबई, विक्रोळी पार्कसाईड येथील संदेश विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थीनी अदिती पोपट सातपुते यांनी द्वितीय तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायनामध्ये नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयाचा विद्यार्थी अथर्व ओंकार वैरागकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

श्री. केदार म्हणाले, देशाचे युवा धोरण २००३ मध्ये जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील १५ ते २९ वयोगटातील युवा लोकसंख्येचा विचार करता देशाच्या युवा धोरणाच्या अनुषंगाने राज्याचे स्वतंत्र युवा धोरण तयार करुन त्याद्वारे युवक कल्याणच्या विविध योजना राबविण्यासाठी राज्याचे युवा धोरण जाहीर करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय एकात्मता तसेच युवांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत १९९४ पासून राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन प्रतिवर्षी युवा दिन १२ जानेवारी रोजी करण्यात येते. यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संघ सहभागी होतात. राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी जिल्हा विभाग राज्य,राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्यामध्ये युवा महोत्सवाचे आयोजन प्रभावीपणे करण्यासाठी जिल्हा विभाग,राज्य स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करुन राज्याचा प्रतिनिधी संघ राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवडण्यात येतो.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्यस्तर युवा महोत्सव सन २०२०-२१ चे दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तर युवा महोत्सवासाठी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर, अमरावती या आठ विभागातून विविध प्रकारात युवकांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये निवडण्यात आलेले युवकांना राष्ट्रीय पातळीवर पाठविण्यात आले होते.

Popular posts
स्टडी ग्रूपची टीसाइड युनिव्हर्सिटीशी हातमिळवणी
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image