सायबर पोलीस ठाण्यांचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पाच विभागीय सायबर पोलीस ठाण्यांचे ऑनलाईन उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. याचबरोबर ९४ पोलीस ठाण्यांमधल्या स्वागत कक्षांचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. या उद्घाटन सोहळ्याला गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगल प्रभात लोढा आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.