‘शेजारी प्रथम’ या धोरणाला अनुसरून भारताने आपल्या शेजारील आणि मित्र देशांना कोविड प्रतिबंधात्मक लस पुरवण्यास सुरुवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘शेजारी प्रथम’ या धोरणाला अनुसरून भारताने आपल्या शेजारील आणि मित्र देशांना कोविड प्रतिबंधात्मक लस पुरवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, म्यानमार, मॉरीशस, मोरोक्को आणि सेशेल्स या देशांना काल भारतीय बनावटीची कोविशिल्ड लस प्राप्त झाली. या देशांना टप्प्याटप्प्याने ही लस पुरवण्यात येईल असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

मात्र असे करताना देशांतर्गत या लसीचा पुरेसा पुरवठा असेल याची खातरजमा करण्यात येईल असेही श्रीवास्तव पुढे म्हणाले. ब्राझीलला देखील भारताने कोविशिल्ड या कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा केला आहे. अशा संकट काळात भारताने केलेल्या मदतीबद्दल ब्राझीलचे राष्ट्रपती जईर बोल्सोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.