प्रधानमंत्र्यांनी सौरव गांगुलीच्या प्रकृतीची केली चौकशी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

प्रधानमंत्र्यांनी गांगुली दाम्पत्यांशी बोलून प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या.

गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर कोलकाता इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणा होत आहे. सौरव गांगुली यांच्या देशविदेशातील चाहत्यांनी त्यांना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .