ब्रिटन मधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबर पर्यंत बंदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये कोरोनासंसंर्गात पुन्हा वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन मधून भारतात येणाऱ्या  विमानांवर ३१ डिसेंबर पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं घेतला आहे. ही बंदी उद्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनहून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोनासंबंधित आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.