आयफाल्कनची ख्रिसमस आणि नववर्षाकरिता ऑफर

 


मुंबई: डिजिटल-रेडी होम एन्टरटेनमेंट समाधान प्रदाता आयफाल्कनने ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने विशेष ऑफर्सची घोषणा केली आहे. या ऑफर्सचा भाग म्हणून ब्रँडने एच७१ क्यूएलईडी टीव्ही आणि के ६१ ४के अँड्रॉइड टीव्ही अनुक्रमे ५३,९९० रुपये आणि २५,९९० रुपये या सुरुवातीच्या किंमतीत जवळच्या स्टोअरमध्ये उपलब्ध करून दिला आहे. ग्राहक त्यांच्या जवळच्या स्टोअरमधून हे डिव्हाइस ३१ डिसेंबर २०२० पर्यंत खरेदी करू शकतात.

एच७१ हा ५५ इंच आकारात उपलब्ध असून त्यात मेटल बॉडी आहे. बेझल-लेस डिझाइनद्वारे यूझर्स ना फुल-स्क्रीन अनुभव दिला जातो. यात क्वांटम डॉट, डॉल्बी व्हिजन आणि एचडीआर 10+ अॅडव्हान्समेंट फिचर्स असून याद्वारे समृद्ध आणि स्पष्ट ऑन-स्क्रीन कंटेंटचा अनुभव मिळतो.  यात डॉल्बी अॅटमॉस आणि डीटीएस-एचडी साउंड टेक्नोलॉजी असून याद्वारे उत्कृष्ट आणि ऑप्टीमाइज्ड ऑडिओ आउटपुट मिळते.

के६१ हा टीव्ही ४३", ५०" आणि ५५" या तीन स्क्रीनसाइजमध्ये उपलब्ध आहे. यात मायक्रो डिमिंग टेक्नोलॉजी आणि एचडीआर सपोर्ट असून याद्वारे ग्राहकांना टीव्ही पाहण्याचा सर्वोत्तम अनुभव मिळतो. मेटलिक स्पर्श आणि बेझल-लेस डिझाइनचे हे उपकरण एच७१ सारखे दिसते. यात डॉल्बी ऑडिओ असून याद्वारे लहान स्पीकरवर देखील उत्कृष्ट सराउंड साउंड मिळतो. या दोन्हीं टीव्हींमध्ये एआयxआयओटी तंत्रज्ञान असून याद्वारे यूझर्स सर्व गूगल होम इनेबल होम डिव्हाइसशी कनेक्ट करू शकतात.