प्रधानमंत्री करणार देशातल्या पहिल्या चालक विरहित मेट्रो गाडीचं उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या देशातल्या पहिल्या चालक विरहित मेट्रो गाडीचं व्हिडीओ कॉन्फेरेंसिंगच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत.

नवी दिल्ली इथल्या मॅजेंटा मेट्रो मार्गावर सुरु होणाऱ्या या गाडी मुळे देशात जलद आणि सुखकर प्रवासाचं नवं पर्व सुरु होईल. चालक विरहित गाडी पूर्णपणे स्वयंचलित असल्यानं मानवी चुकांची शक्यता नाहीशी होईल.