पुणे विभागातील 5 लाख 27 हजार 741 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात कोरोना बाधित 5 लाख 54 हजार 398 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

 https://ekachdhyeya.com/wp-content/uploads/2020/11/NPIC-20201128153518.jpg

पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 27 हजार 741 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 54 हजार 398 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 11  हजार 204 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 453 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 55 हजार 842 रुग्णांपैकी 3  लाख 38 हजार 457 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8  हजार 782 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 603  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.42 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  95.11 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 595 रुग्णांपैकी 50 हजार 965 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  883 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 213 रुग्णांपैकी 45 हजार 339 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1  हजार 193 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 681  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सांगली जिल्हा

सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 47  हजार 376 रुग्णांपैकी 45 हजार 389 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 261 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 372 रुग्णांपैकी 47  हजार 591 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 85 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 696  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 878 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 668 , सातारा जिल्ह्यात 88, सोलापूर जिल्ह्यात 105, सांगली जिल्ह्यात 14 तर कोल्हापूर जिल्ह्यात 3 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण - 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 44 आहे. पुणे जिल्हयामध्ये 671, सातारा जिल्हयामध्ये 174, सोलापूर जिल्हयामध्ये 160, सांगली जिल्हयामध्ये 33 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 6 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 31 लाख 59 हजार 987 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5 लाख  54 हजार 398 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि.  19 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )