इतर मागासवर्गीयांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक; पदभरती, शिष्यवृत्तीसह विविध विषयांवर चर्चा

  इतर मागासवर्गीयांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक;  पदभरती, शिष्यवृत्तीसह विविध विषयांवर चर्चा

मुंबई: इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्या प्रश्नांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, इमाव बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास वर्ग यांच्या अनुशेष भरती, शिष्यवृत्ती, विभागाला आवश्यक निधी उपलब्धता तसेच विविध सवलतींचा लाभ देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image