क्विक हीलने वर्तवली २०२१ वर्षातील सायबर संकटांची भाकिते

 


मुंबई: कोरोना आणि संपूर्ण जगावरील त्याचे पडसाद यामुळे २०२० चे हे वर्ष अनपेक्षित घडामोडींनी चांगलेच गाजले. कोरोनामुळे व्यवसाय व बरेचसे दैनंदिन व्यवहार डिजिटल झाले खरे, पण त्यासोबतच सिस्टीम्समध्ये मॅलवेअर इंजेक्ट करुन संवेदनशील माहिती चोरणारे हॅकर्सही वाढले. २०२१ मध्ये आपल्या डिजिटल व्यवसायास सायबर सिक्योरिटीने सुसज्ज करण्यावर व्यावसायिकांचा भर असणार आहे. हे संभाव्य धोके लक्षात घेण्याच्या उद्देशानेच कॉर्पोरेट कंपन्या, एसएमई तसेच सरकारी कार्यालयांना आयटी सिक्योरिटी व डेटा प्रोटेक्शन सेवा पुरवण्यात अव्वल असणा-या क्विक हीलने काही भाकिते वर्तवली आहेत. येत्या वर्षात डबल एक्स्टॉर्शन, क्रिप्टो मायनिंग, एथिकल हॅकिंग यासारखे प्रकार वाढतील असा क्विक हीलचा अंदाज आहे.

व्यावसायिकांवर रॅनसमवेअरसह रॅनसमहॅकचे दुहेरी संकट: पूर्वीच्या वॉना क्राय, पेट्या, र्यूक, ग्रँडक्रॅब ई हॅकिंग पद्धतींनी केवळ डीस्क्स एनक्रीप्ट केल्या जात व डिसक्रिप्टींगसाठी खंडणी वसूल केली जाई. अलिकडे मात्र रॅनसमवेअरद्वारे फाईल्ससोबतच वैयक्तिक व संवेदनशील माहितीही हॅक केली जाऊ शकते. खंडणी देण्यास मना करता ही माहिती उघडपणे प्रकाशित करण्याच्या धमक्या दिल्या जातात. संवेदनशील डेटा उघड झाल्याने कंपन्यांच्या जीडीपीआर वर अतिशय गंभीर परिणाम होतात; तर हे टाळायचे म्हटले तर भरमसाठ खंडणी भरावी लागते, असे हे दुहेरी संकट आहे. या युक्तीस रॅनसमहॅक अथवा डबल एक्स्टॉर्शन असे म्हणतात. मेझ, डॉपल पेमर, र्युक, लॉकबीट, नेटवॉकर, माऊंटलॉकर, नेटफिल्म हे ज्ञात रॅनसमहॅकर्स असून त्यांचा २०२१ मध्ये देखील बराच प्रभाव असणार आहे.

क्रिप्टो माइनर्सची नवी फळी: क्रिप्टोकरंन्सीची किंमत कायमच जास्त असते व ह्या किंमती २०२१ मध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. बीटकॉइन्स आणि मोनेरो यासारख्या क्रिप्टोकरंन्सीची किंमत २०२० या वर्षात तब्बल तिपटीने वाढली आहे. क्रिप्टोकरंन्सीच्या वाढत्या किंमती हॅकर्सना अधिकाधिक क्रिप्टो माइनर्स बनवून त्याद्वारे खंडणी उत्पन्नाचे निमंत्रण देत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेपेक्षा उपाययोजनांकडे लक्ष वेधणारी संकटे कोरोना महामारीच्या सुरुवातीला रॅनसमवेअरचे स्वरुप व त्यांची नावे फिशींग साईट्स, बनावट मोबाईल एप्स तसेच कोरोनाबद्दल जागृतीपर माहिती, लक्षणं, उपाययोजना, पीपीई कीट्स, टेस्ट कीट्स, लॉकडाऊन व सोशल डीस्टंसिंगशी संबंधित होती.

डीप फेक्स ते सायबर फ्रॉड्स: डीप फेक्स म्हणजे डीप लर्निंग टेक्नॉलॉजीने एखाद्या व्यक्तीचे खोटे ऑडियो अथवा विडियोज बनवणे. हे ऑडियो /विडियोज खोट्या बातम्या व सायबर फ्रॉड्ससाठी वापरले जातात. अशा फसवणूकीचा अव्वल नमुना म्हणजे एखाद्या कंपनीचा कार्यकारी अधिकारी आपल्या कर्मचा-यां ना ठराविक रक्कम पाठवायला सांगतो असा बनावट ऑडियो/ विडियो बनवला जाणे असे बरेच प्रकार २०२१ मध्ये घडू शकतील.

फिशींग अटॅक्स मधील ऑटोमेशन: हॅकर्स दिवसेंदिवस अधिकाधिक फिशींग अटॅक्स ऑटोमेशन पद्धतीने करत आहेत. २०२१ मध्येही असेच होईल. युजर्सना आमिष दाखवण्यासाठी सोशल इंजिनियरींग ट्रीक्सचा वापर करण्यात येईल.

मोबाईल बँकींगमधील वाढते सायबर हल्ले: सप्टेंबर २०२० मध्ये सरबेरस मोबाईल बँकींग ट्रोजनचा सोर्स कोड सर्वांसाठी प्रकाशित केला गेला, हा कोड मोफत होता. यानंतर लगेचच मोबाईल अॅप इंन्फेक्शन्समध्ये भरमसाठ वाढ झालेली दिसून आली होती. त्यामुळे साहजिकच येत्या वर्षात मोबाईल बँकींग क्षेत्रात सरबेरस कोडवर आधारित मॅलवेअर येण्याची शक्यता आहे.

क्विक हील सिक्योरिटी लॅबचे संचालक हिमांशू दूबे म्हणाले की 'कोविड-१९ व त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणामांची कोणी कल्पनाही केलेली नसेल. तसेच या महामारीत सायबर गुन्हेगारांना नव्याने हॅकिंगचे बहाणे मिळाले. ही गुन्हेगारी येत्या वर्षातही असणार आहे. जसे की या वर्षात डबल एक्स्टॉर्शन क्रिप्टो मायनिंग, एथिकल हॅकिंग यासारखे प्रकार बोकाळतील. आम्ही क्विक हीलध्ये आमच्या ग्राहकांसाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणण्यासाठी व नवनवीन सायबर हल्ल्यांपासून त्यांना सावध करण्यासाठी कटिबद्ध आहोत.'

Popular posts
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
देशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री
Image
राज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त
Image
पुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
Image
१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ
Image