कांद्यावरची निर्यात बंदी १ जानेवारीपासून मागे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्यावरची निर्यात बंदी येत्या १ जानेवारीपासून मागे घेण्यात येणार आहे.

विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी काल याबाबत एक अधिसूचना जारी करत, एक जानेवारीपासून कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.

कांद्याच्या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारनं गेल्या सप्टेंबर महिन्यात कांदा निर्यातीवर बंदी घातली होती.