केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुवाहाटी इथल्या अमिनगाव इथं करणार विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज गुवाहाटी इथल्या अमिनगाव इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. गुवाहाटीमधल्या दुसऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

‘आसोम दर्शन’ या योजनेअंतर्गत ते नामघरांना, म्हणजेच आसाममधल्या प्रार्थना स्थळांना आर्थिक निधीचं वितरण करतील. शहा यांच्या हस्ते आज राज्यातल्या ९ विधी महाविद्यालयांच्या कामकाजालाही सुरुवात होणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल उपस्थित असतील. या दौऱ्यात शहा हे राज्यातील भाजप नेत्यांबरोबरही बैठक घेणार आहेत.