रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातल्या मुरुड जंजिरा किल्ल्यावर पर्यटनासाठी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घातलेली बंदी, पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांच्या मागणीनंतर मागे घेण्यात आली आहे.

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तसे आदेश  दिले आहेत.२५ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता.मात्र आता नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि दररोज केवळ ४०० पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश देण्याच्या अटीवर किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.