ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताची ऑस्ट्रेलियावर ५३ धावांची आघाडी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अॅडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारतानं ऑस्ट्रेलीयावर ५३ धावांची आघाडी मिळवली आहे. आज सकाळी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर भारताचा पहिला डाव कालच्या धावसंख्येत केवळ ११ धावांची भर घालून २४४ धावांवर संपुष्टात आला.

त्यानंतर फलंदाजीला आलेला ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ १९१ धावांतच तंबूत परतला. भारताच्या रविकुमार अश्विननं सर्वाधिक ४, उमेश यादवनं ३ तर जसप्रित बुमराहनं २ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या वतीनं टीम पेन यानं सर्वाधिक ७३, तर लबुशेननं ४७ धावा केल्या. आजचा खेळ संपला तेव्हा भारतानं पृथ्वी शॉची विकेट गमवून १ बाद ९ धावा केल्या आहेत.