देशात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर पोचला आहे.आज सकाळपर्यंत २६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले.

त्यामुळे देशात आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८ लाख ६० हजार २८० झाली आहे. सध्या देशात दोन लाख ५७ हजार ६५६ रुग्ण उपचार घेत आहेत. काल २१ हजार ८०० नव्या बाधितांची नोंद झाली असून, बाधितांचा आकडा एक कोटी दोन लाख ६६ हजारांवर गेला आहे. या आजाराने देशातल्या एक लाख ४८ हजार ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.