ऑनलाईन महारोजगार कार्यक्रमाला येत्या २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं ऑनलाईन महारोजगार कार्यक्रमाला येत्या २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. विभागानं १२ आणि १३ डिसेंबरला असा मेळावा घेतला होता. त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्यानं हा कार्यक्रम २० डिसेंबर पर्यंत सुरु ठेवायचा निर्णय घेतल्याचं मलिक यांनी सांगितलं.

  या मेळाव्याला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी रोजगार डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन (rojgar.mahaswayam.gov.in) या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी करताना आपला मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि आधार क्रमांकाचा तपशील द्यावा असं मलिक यांनी सांगितलं.

  या आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांना आपली माहिती अद्ययावत करता येईल असंही ते म्हणाले. कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या उद्योजकांनीही या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असं आवाहनही मलिक यांनी केलं आहे.