रचना बदललेल्या नव्या विषाणूविरोधातही लस प्रभावी ठरेल, आरोग्य मंत्रालयाचा विश्वास

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): रचना बदललेल्या नव्या विषाणूविरोधातही लस प्रभावी ठरेल असा विश्वास आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केला आहे.

सध्या तयार होत असलेल्या लसी नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार नसल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, असं मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

दरम्यान, आसाम, आंध्र प्रदेश, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांमध्ये  कोविड-19 च्या लसीकरण प्रक्रियेची प्रात्यक्षिकं गेल्या दोन दिवसात यशस्वीरीत्या पार पडली.