‘भारताने जगाला प्राणीमात्र, निसर्ग व वसुंधरेच्या अधिकाराचा व्यापक विचार दिला’ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
• महेश आनंदा लोंढे
मुंबई: संयुक्त राष्ट्र संघटनेने दिनांक १० डिसेंबर १९४८ रोजी सकल राष्ट्रीय मानवाधिकार उद्घोषणेचा स्वीकार केला त्यानंतर दरवर्षी १० डिसेंबर हा दिवस मानवाधिकारांप्रती जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून पाळला जातो. मात्र भारतात मानवाधिकाराची फार प्राचीन परंपरा आहे. भारतीय संस्कृतीने केवळ मनुष्यमात्रांच्या अधिकारांचाच नाही तर सकल जीवसृष्टी, प्राणीमात्र, निसर्ग व वसुंधरेच्या अधिकाराचा व्यापक विचार केला असून हा विचार जगाला मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगातर्फे आंतरराष्ट्रीय मानावाधिकार दिनाचे औचित्य साधून एका ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले. त्याचे राजभवन येथून दूरस्थ पद्धतीने उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते.
मानवाधिकार आयोगासमोर मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारी येत असतात. अशावेळी आयोगाने सर्व बाजूंचा साकल्याने विचार करून न्यायनिवाडा करावा, अशी सूचना राज्यपालांनी केली.
चर्चासत्राच्या उद्घाटनाला राज्य मानवाधिकार आयोगाचे कार्यवाहू अध्यक्ष एम.ए. सईद, अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार गौतम व नितीन करीर, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, टाटा समाजविज्ञान संस्थेच्या विधी विभागाचे अधिष्ठाता अरविंद तिवारी, इंटरनॅशनल जस्टीस मिशनचे उपाध्यक्ष संजय मकवान तसेच व महाराष्ट्र राज्य विधी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप उके प्रामुख्याने उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.