पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात कोरोना बाधित 5 लाख 42 हजार 723 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

 

पुणे :- पुणे विभागातील  5  लाख 13  हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5  लाख 42  हजार 723 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14  हजार  146 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण  15 हजार 156  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण  94.60 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  3 लाख 47  हजार 815 रुग्णांपैकी  3  लाख  28  हजार 488  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण  10  हजार 927  आहे. कोरोनाबाधित एकूण 8  हजार 400  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.42  टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  94.44  टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण  51  हजार 947 रुग्णांपैकी  49 हजार 579  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  627 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार  741 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 779 रुग्णांपैकी  43 हजार 197  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1   हजार 957 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 625  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सांगली जिल्हा

सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 47  हजार  22 रुग्णांपैकी 44 हजार 944 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 375 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 703 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 160 रुग्णांपैकी 47  हजार  213 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 260 आहे. कोरोनाबाधित एकूण  1 हजार 687  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 17 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 685 , सातारा जिल्ह्यात 173, सोलापूर जिल्ह्यात 114, सांगली जिल्ह्यात 29 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण - 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण  939 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 664, सातारा जिल्हयामध्ये 56, सोलापूर जिल्हयामध्ये  138, सांगली जिल्हयामध्ये  56 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 25 रुग्णांचा समावेश आहे.


पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 29 लाख  62 हजार  361 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी   5 लाख  42 हजार 723  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

 

( टिप :- दि.  6 डिसेबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Popular posts
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image