पाकिस्तानकडून शस्त्र संधीचे उल्लंघन, गोळीबारात नागपूरचे नाईक भूषण सताई शहीद


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं काल उत्तर जम्मू काश्मीर सीमेवर अनेक विभागांमध्ये शस्त्र संधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात नागपूर जिल्हातल्या काटोल इथले नाईक भूषण सताई हे शहीद झाले. ते मराठा बटालियन मध्ये कार्यरत होते. सुट्टय़ा अर्धवट सोडून ते दहा दिवसांपूर्वीच कर्तव्यावर रुजू झाले होते. कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. भूषण यांचे पार्थिव आज रात्री नागपुरात पोचण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.