देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ पूर्णांक ७९ शतांश टक्के


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर आता ९२ पूर्णांक ८९ टक्क्यांवर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयान आज सकाळी जारी केलेल्या निवेदनानुसार देशातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ८० लाख ६० हजार इतकी झाली आहे.

दरम्यान देशात गेल्या २४ तासात कोविड-१९ चे ४७ हजार ९०५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८६ लाखांच्या पुढे गेली आहे.

गेल्या २४ तासात कोविडच्या ११ लाख ९३ हजार चाचण्या घेण्यात आल्या.