मिठाई तसेच अन्य खाद्य पदार्थांवर ते तयार करण्याची तारीख आणि उपयोगात आणण्याची अंतिम तारीख असणं बंधनकारक.


मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळीत तयार होत असलेली मिठाई तसेच अन्य खाद्य पदार्थांवर ते तयार करण्याची तारीख आणि उपयोगात आणण्याची अंतिम तारीख म्हणजेच एक्सपायरी डेट या दोन्ही तारखा असणं बंधनकारक आहे, असं अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं.


राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.


अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण बाबींवर अतिशय बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे.


जनतेला सकस आणि चांगलं अन्न दिवाळीच्या काळात मिळालं पाहिजे याकडे पूर्णपणे लक्ष देण्यात येत आहे.


नागरिकांची दिवाळी सुरक्षित साजरी व्हावी यासाठी शासन दक्ष असल्याचं ते म्हणाले.