पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी ९ नोव्हेंबरला होणार


मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासंदर्भात अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असलेली सुनावणी काल स्थगित करण्यात आली,आता पुढची सुनावणी ९ नोव्हेंबरलाहोणार आहे. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला आव्हान देत,रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयातपुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला आहे. यावर अर्णव गोस्वामी,फिरोज शेख आणि नितेश सारडायांचे वकील आज युक्तिवाद करतील.