प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरीनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं रक्षण करणाऱ्या सशस्त्र दलांचा भारताला अभिमान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज राजस्थानात जैसलमेर इथं लोंगोवाला चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली, त्यावेळी ते बोलत होते.सैनिक आहेत म्हणून देश आहे, आज सर्व भारतीयांच्या शुभेच्छा आणि प्रेम घेऊन आलो आहे, त्याचबरोबर देशातल्या प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद घेऊन आलोय, अशा शब्दांत प्रधानमंत्र्यांनी भारतीय जवानांचा गौरव केला. हिमालयाचं शिखर असो, वाळवंट असो, घनदाट जंगल असो किंवा समुद्र, भारतीय सैनिकाचा प्रत्येक ठिकाणी विजय झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

भारताजवळ ताकद आणि चोख प्रत्युत्तर देण्याची इच्छाशक्ती असून, विस्तारवादाविरुद्धही भारत आवाज उठवत असल्याचं ते म्हणाले. सीमेवर सैनिकांचं धैर्य कायम राखण्यासाठी त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं सांगून मोदी यांनी राष्ट्र सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या सैनिकांना नमन केलं.


दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी थेट गडचिरोली गाठण्याचा निर्णय घेतला आहे. ''पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मी गडचिरोलीमधल्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. चोवीस तास जनसेवेत असलेल्या पोलिसांचा उत्साह वाढवणं ही माझी जबाबदारी आहे.

त्यामुळे घरी न थांबता मी थेट 'फिल्ड'वर जाण्याचे ठरवले. कठीण स्थितीत सेवा करणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढवन्याचा माझा प्रयत्न आहे, असं देशमुख यांनी सांगितलं. 


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
कर्ज घेऊन व्यवसाय यशस्वी करणाऱ्या तरुणांची कोरोना संकटग्रस्तांना मदत
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
Image